वणी /
राज्यातील राजकारणात आपला ठसा उमटवणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना शहरातील टिळक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर सायंकाळी सात वाजता सर्वपक्षीय नेत्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष व जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारा नेता गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आदरांजली सभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी स्थानिक आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, राजु उंबरकर, ऍड.देविदास काळे, दिनकर पावडे, राकेश खुराणा, आशिष मोहितकर, पत्रकार बांधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन ऍड निलेश चौधरी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.