मानकी येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

वणी /

वणी तालुक्यातील मानकी येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे.
या पुण्यतिथी सोहळ्यात कीर्तन, प्रवचन, भजन, तसेच महाराजांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post