वणी :-
भंडारा येथे एका कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी अंजली भारती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी विषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद व द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सदर वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानास तडा गेला असून समाजात चुकीचा संदेश जात आहे. अशा प्रकारची विधाने हि केवळ महिलांचा अपमान करणारी नसुन कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी आहे.
अशा महिलांना समानतेचा अधिकार मिळालेला असताना, अशा व्यक्ती मार्फत महिलां विरोधात अपमानास्पद वक्तव्य होणे हे अत्यंत निंदनीय व गंभीर स्वरूपाचे आहे. यामुळे महिला मध्ये संतापाची भावना असून सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंजली भारती यांच्या विरोधात संबंधित कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी व कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.