मुर्धोनी ग्राम पंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर, २६ जानेवारी ला पालकमंत्र्यांच्या हस्ते सरपंच प्रशांत भोज यांचा होणार सन्मान;

वणी /

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०२३–२४ अंतर्गत मुर्धोनी ग्राम पंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचा बक्षीस वितरण सोहळा २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकासात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुर्धोनी ग्राम पंचायतीची ही निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल सरपंच प्रशांत भोज, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post