विद्याताई आत्राम नगर अध्यक्ष पदी आरूढ, वणी नगर परिषदेवर भाजपाची निर्विवाद बहुमताने सत्ता स्थापन

वणी :–

      वणी नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा च्या विद्याताई खेमराज आत्राम या प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यासोबत वणीच्या मतदारांनी भाजपच्या झोळीत 18 नगरसेवक टाकले आहे. त्यामुळे वणी नगर परिषदेवर भाजपाची निर्विवाद बहुमताने सत्ता स्थापन झाली आहे. त्याचा पदग्रहण सोहळा सोमवारी १२ जानेवारी ला नगर परिषदेच्या प्रांगणात दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई यांनी आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके , माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहर अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. 
माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई खेमराज आत्राम यांचे स्वागत करून अध्यक्ष पदाचे हस्तांतरण केले. 
      सर्वप्रथम या पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगर परिषद मध्ये कार्यरत सर्व आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व महिला शिक्षिकांचा साडी चोळी देऊन या प्रसंगी सन्मान करण्यात आला. 
    या प्रसंगी तारेंद्र बोर्डे यांनी त्यांच्या कार्यकाळात बगीच्यांचा विकास, रस्ते नाल्या, आरोग्य या विविध विषयात केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पक्षभेद विसरून काम करण्याचे आवाहन केले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक बाबतीत प्रचंड निधी दिल्यामुळे वणी शहराचा चेहरा मोहरा बदलवू शकलो. यानंतरही वनीकरांच्या अपेक्षा पूर्ण करू असे आश्वास्त केले. 
    ना. अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांच्या विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेवा व समर्पण हा भाव घेऊन प्रत्येक नगर सेवक व पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे सुचविले. त्यासोबत भयमुक्त शहर असल्याची जाणीव येथील आया बहिणीमध्ये निर्माण करावे असे आवाहन केले. 
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गव्हाणे यांनी केले. या प्रसंगी दिनकरराव पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, प्रदीप जेऊरकर, जयमाला दर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.

उपाध्यक्षपदी राकेश बुग्गेवार तर तिनही स्विकृत सदस्य बिनविरोध

नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपाध्यक्षपदी भाजपचे राकेश बुग्गेवार यांची, तर स्वीकृत सदस्य म्हणून रवी बेलूरकर (भाजप), किशन खुंगर (भाजप), आणि शत्रुघ्न मालेकार (उद्धवसेना) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post