विद्यार्थ्यांनो आव्हाने हसत खेळत स्वीकारा - डॉक्टर दिलीप अलोने

वणी /

आयुष्याला सामोरे जात असताना हसत खेळ आव्हाने स्वीकारा आणि यशापशयाचा आनंद लुटा अपेक्षा विरहित आयुष्य जगाल तर आनंदच वाट्याला येईल कारण अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे असे मत लोक कलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले. 
तणाव मुक्त विद्यार्थी अभियाना अंतर्गत येथील आदर्श विद्यालय आयोजित नो टेन्शन अटेंशन या कार्यक्रमात अलोने विद्यार्थ्यांना प्रेरित करत होते.
 यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मोहिते, पर्यवेक्षक पीदूरकर, अरुण कुमार खैरे, उपस्थित होते. 
आपल्या उगवत्या शैलीत अनेक रंजक किस्से सांगत आलोने यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत मार्गदर्शन केले आणि आयुष्याचा मनमुरात परंतु निर्विकार आनंद लुटा असा मोलाचा सल्ला दिला. 
यावेळी अरुण कुमार खैरे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक मोहिते यांनी अलोने यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. 
बैजनाथ खडसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post