वणी /
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला वणी शहरात मोठा धक्का बसला आहे! वणी शहर संपर्क प्रमुख राजू किसन तुणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या राजू तुराणकर यांनी पक्षातील अंतर्गत राजकारण, कार्यकर्त्यांचे खच्चीकरन अशा अन्यायामुळे हा कठोर निर्णय घेतल्याचे राजीनामा पत्रातून स्पष्ट केले आहे.
राजू तुराणकर हे 1994 पासून शिवसेनेत सक्रिय असून विद्यार्थी तालुका प्रमुख, नगरसेवक, शहर प्रमुख आणि शहर संपर्क प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. मात्र 2025 मध्ये झालेल्या वणी नगरपरिषद निवडणुकीत राजु
तुरानकर यांचा झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला. अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही योग्य सन्मान व विश्वास न मिळाल्याने त्यांची तीव्र नाराजी निर्माण झाली होती. राजीनाम्यात त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी, कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि वरिष्ठ नेत्यांकडून संवादाचा अभाव या गंभीर बाबींचा उल्लेख केला आहे. प्रचार, सभा, जनसंपर्क यांचा अभाव असल्यामुळे निवडणुकीतील पराभवही टाळता आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या राजीनाम्यामुळे वणीतील शिवसेना संघटनात खळबळ उडाली असून अनेक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान नगर परिषद निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीच्या रुपरेषेत शहर संपर्क प्रमुख राजु तुरणकर व शहर संघटक मनिष बतरा यांचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही अशी अपमानास्पद वागणूक वारंवार होत आली असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आगामी काळात राजू तुराणकर कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.