वणी /
सह्याद्री न्युज पोर्टल चे संपादक अमोल कुमरे यांच्या मातोश्री श्रीमती राधाबाई सूर्यभान कुमरे (रा. मंच्छिद्रा ता. मारेगाव) यांचे आज रविवारला दुपारी १२ वाजता नागपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते.
राधाबाई कुमरे यांना दोन दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थतेने वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांची आज प्राणज्योत मालविली.
राधाबाई यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड असा आप्तपरिवार आहे. आज सायंकाळी ६:३० वाजताचे दरम्यान मच्छिंद्रा येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
(न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!)