वणी /
शहरातील भिमनगर, (एस.पी. एम. हायस्कुल मागील परिसर) येथे खुले मैदान असून त्या ठिकाणी अनेक मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहेत. त्याच ठिकाणी सदर परिसरातील छोटे मुले मैदानावर खेळायला जात असतात. तसेच सायंकाळी महिला वर्ग जेवण केल्यानंतर फेरफटका मारायला येत असतात. त्यामुळे लहान मुलांच्या जिवीतास व फिरायला येणा-या महिला वर्गाला सुध्दा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर ठिकाणावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.०१ नोव्हेंबर रोजी सायं. ५ ते ६ वाजताचे दरम्यान भिमनगर येथील प्रमोद चांदेकर यांच्या लहान मुलगा मैदानावर खेळायला गेला असता तेथे मुक्त संचार करीत असलेल्या मोकाट जनावराने त्याचेवर हल्ला चढवुन गंभीर स्वरुपात जखमी केले आहे. यापूर्वीसुध्दा अनेक लोकांसोबत अशीच घटना घडली आहे. तसेच सदर रस्ता हा ग्रामीण रुग्णालयांकडे जाणारा असून याच मैदानावरुन खेड्यापाड्यातून अनेक रुग्ण रुग्णालयांत जातं असतात. त्यांना सुष्दा धोका निर्माण होवु शकतो. त्यामुळे तेथील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.