वणी /
वणी शहरातील प्रभाग क्रमांक १० हा मध्यवर्ती आणि व्यापारी वर्गाचा प्रमुख भाग म्हणून ओळखला जातो, त्या भागात सध्या अक्षय राजेंद्रजी बोथरा यांचे नाव नगरसेवक पदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे.
स्थानिक व्यापारी वर्ग तसेच तरुणवर्गाकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
बोथरा हे तरुण, उत्साही आणि सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच वणीतील विविध राजकीय पक्ष त्यांना आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वणीच्या या प्रभागाला आता नवा आणि ऊर्जावान चेहरा हवा आहे. विकासासाठी नवी उर्मी, नवी दृष्टी असलेले प्रतिनिधी पुढे यावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अनेकांच्या मते, या अपेक्षांवर अक्षय राजेंद्रजी बोथरा खरे उतरतील, असा विश्वास प्रभागात व्यक्त केला जात आहे.