वणी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (VBA) ताकदीने उतरणार असून, विशेषतः वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार तयारी सुरू असल्याचे आज पत्रकार परिषदेत वंचितचे वणी विधानसभा अध्यक्ष राजु निमसटकर यांनी सांगितले.
वणी नगराध्यक्षपदापासून ते शहरातील सर्व प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम उमेदवार उभे करणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
भाजपा आणी त्यांचे मित्र पक्ष या शक्तींना सत्तेपासून थांबवायचे आहे, म्हणूनचं "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत.
मात्र, आत्तापर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत आमचे अधिकृतपणे बोलणे झालेले नाही." असेही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
युतीच्या संदर्भात बोलताना वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी पुढे स्पष्ट केले की, जर सन्मानजनक जागा वाटप होत असेल तरचं, महाविकास आघाडी (MVA), मित्रपक्ष आणि सामाजिक संघटनांसोबत चर्चेची दारे खुली राहतील.
वणीत वंचित चा झेंडा फडकाविणार!
"""""""""""""""""""'"'"''''''''''''''''''''"""""""""""
स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त करत नेत्यांनी सांगितले की, "यावेळी वणी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये वंचितचा झेंडा फडकवूच !" वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारणार असून, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी पासून ते वणी शहरातील सर्व प्रभागांमध्ये ताकदीचे उमेदवार उभे केले जातील. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संदर्भात देखील समझोता झाला तरच, वंचित समविचारी पक्षासोबत निवडणूक लढवेल. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आयोजित पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील यांच्यासह मंगल तेलंग, वैशाली गायकवाड, डॉ.प्रशिक बरडे, आशिष पाझारे, ऍड.चंदू भगत, ज्ञानेश्वर मुन, अर्चनाताई नगराळे, किशोर मुन, डॉ.आनंद वेले, मिलींद नगराळे, नंदिनी ठमके, प्रणिता ठमके, निळावती मुन, सुवर्णा नंराजे, मीना दिघाडे,अंकित पाझारे, बंटी तामगाडगे, ऍड. तामेश्वर लोणारे, राहुल नगराळे, गोविंदा दुर्गे, शंकर रामटेके, भारत कुमरे, सतीश गेडाम, आकाश दुपारे, अमोल दुपारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.