वणी /
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील वांजरी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महेश रामभाऊ उज्वलकर वय १९ वर्ष रा.वांजरी असे मृतकाचे नाव आहे.
महेश ने बुधवारी दुपारच्या सत्रात शेतात जाऊन झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतला सदर माहिती घरच्यांना मिळाली असता सर्वांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी महेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती वणी पोलीस स्टेशन ला मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला.
महेश ने ऐन तारुण्यात आपली जिवन यात्रा का संपविली? याचे कारण कळू शकले नाही.
पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.