वणी /
आगामी वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून मिलिंद बावणे हे नगरसेवकपदाची निवडणुक लढण्यासाठी इच्छूक आहेत.
मागील २० वर्षांपासून प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे.
या प्रभागात रंगारीपुरा परिसराने नेहमीच निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असून, मागील तीनही निवडणुकांमध्ये या भागातील उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभाग क्रमांक ११ मधून मिलिंद राजू बावणे हे युवक नेतृत्व म्हणून उभे राहत आहेत.
मिलिंद बावणे हे शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी चे अध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, जयंतीच्या निमित्ताने प्रभागात मोफत नेत्र तपासणी शिबिर,
आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर, तसेच शैक्षणिक सहाय्य उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दरवर्षी भगतसिंग जयंती, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, श्रीराम नवमी अशा राष्ट्रीय व धार्मिक सणांनिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, प्रभाग क्रमांक ११ मध्ये सामाजिक ऐक्याची भावना जोपासण्याचे कार्य
मिलिंद बावणे सातत्याने करत आहेत.
मिलिंद बावणे यांनी सांगितले की,
> “राजकारणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुशिक्षित लोकांवर अशिक्षित लोक राज्य करतात —
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराने प्रेरित होऊन
मी समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्धार केला आहे.”
माझे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून,
“समाज घडविणे आणि विकास साधणे” हे आहे.- मिलिंद बावणे
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांनी आजवर दाखविलेला विश्वास व सहकार्य यांच्या जोरावर या वेळी खऱ्या अर्थाने बदल आणि विकास साध्य होईल, असा विश्वासही मिलिंद बावणे यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज कडे व्यक्त केला आहे.