रिपब्लिकन सेना वणी नगरपरिषद निवडणूक संपुर्ण ताकदीनिशी लढणार. -आयोजित बैठकीत निर्णय

वणी /

वणी नगर परिषदेचे मतदान येत्या २ डिसेंबर रोजी पार पडणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवून विजयाचा शंखनाद करण्यास सुरुवात केली आहे. याच महत्वाच्या निवडणुकीत आता रिपब्लिकन पक्षानेही दंड थोपटले असून वणी नगर परिषद निवडणूक संपुर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचा निर्णय आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.

 दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी शहरातील नगाजी महाराज मंदीर येथे रिपब्लिकन सेनेच्या झालेल्या बैठकीत सर्व ताकदीने वणी नगर परिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यांत आला आहे. सद्यस्थितीत रिपब्लिकन सेना शिवसेना (शिंदे) गटासोबत युतीत असल्यामुळे १० टक्के वाटा रिपब्लिकन सेनेकरीता राखून ठेवला आहे. त्यामुळे वाट्यातील जागा रिपब्लिकन सेना संपुर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यांत आला असून लढवित असलेल्या जागा जिंकून आणण्याचा मानस यावेळी घेण्यांत आला असल्याचे सांगितले. 
          सदर बैठक अँड. गीतांजली तेलंग यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी विदर्भ उपाध्यक्ष भूषण देवगडे , विदर्भ प्रचार प्रसिद्धी प्रमुख प्रशांत निमसटकर, यवतमाळ पूर्व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, यवतमाळ जिल्हा सहसचिव प्रदीप जोमडे, अशोक साबळे जिल्हा महासचिव यवतमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रमणी दसोडे यांनी तर आभार प्रशांत निमसटकर यांनी केले. 
बैठकीला आकाश बोरकर, संजय देठे, शामराव रामटेके, योगीराज भरणे, प्रदिप मुरार, बुध्दघोष लोणारे, यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post