शिवसेना (शिंदे)पक्षाच्या वणी नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या १० नोव्हेंबर ला मुलाखती…, दररोज पक्षप्रवेशाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य...

वणी /

आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने वणीत निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या वतीने इच्छुकांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

१० नोव्हेंबर ला विनायक मंगल कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती 

 सोमवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत श्री विनायक मंगल कार्यालय येथे इच्छुकांच्या मुलाखती जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर, जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहितकर घेणार आहेत. 
इच्छुक कार्यकर्त्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी सांगितले की, वणी नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले वैयक्तिक तपशील, पक्षातील कार्याचा अनुभव, स्थानिक जनसंपर्काची माहिती तसेच समाजकार्याचा तपशील यासह अर्ज नमुन्यात सादर करावेत. यासंदर्भातील अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती
त्यांनी दिली आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षात दररोज पक्षप्रवेश

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटन बळकटी आणि पक्षविस्तार यावर लक्ष केंद्रित करत विश्वास नांदेकर, विजय चोरडिया, विनोद मोहितकर यांच्या नेतृत्वात दररोज पक्षप्रवेश सुरू आहेत. परिणामी नगरपरिषदेसाठी इच्छुकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post