वणी / विशाल ठोंबरे
वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भालर येथील एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे.
संजय भाऊराव लांडे वय ४९ वर्ष रा. भालर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे. शनिवारी शवविच्छेदना नंतर त्यांच्या मृतदेहावर भालर येथील स्मशानभुमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
संजय यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार असून त्यांच्या नावाने मौजा भालर येथे शेतजमीन आहे.