वणी /
नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकारणाचे तापमान चढू लागले आहे. शहरातील प्रत्येक चहाच्या टपरीवर गप्पांचा फड रंगला आहे की, यावेळी कोण येणार मैदानात..?
आता शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये प्रविण ढोके यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
५ वर्षांचा विकास अनुभव घेऊन प्रविण ढोके पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
सर्वसमावेशक विकासाची ध्येयनिष्ठा असलेले प्रविण ढोके प्रभाग ४ मधून निवडणूक लढणार आहे.
उमेदवारीची ताकदः अनुभव, आणि समाजकारण
प्रविण ढोके हे केवळ राजकारणी नाहीत, तर समाजसेवक देखील आहेत. २०१६ मध्ये ते नगर सेवक होते ज्यांनी आपले ज्ञान सामाजिक कार्यात उपयोगात आणले.
५ वर्षांच्या नगरसेवक कार्यकाळातील 'विकास गाथा'
२०१६ ते २०२० या कालावधीत प्रभाग १ मधून नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रविण ढोके यांनी मूलभूत सुविधांच्या विकासाचा पाया रचला. त्यामुळे एक अनुभवी नगर सेवक म्हणून लढविण्याचा फायदा होईल असे बोलले जात आहे.