वणी /
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या अल्पसंख्यांक सेल च्या जिल्हाध्यक्षपदी अरबाज पठाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
हि नियुक्ती रॉकाप अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात करण्यात आली. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉकाप अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक अफजल फारूक होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, सामाजिक न्याय सेलचे संघटन सचिव विजय नगराळे, तसेच वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे आणि शहराध्यक्ष विनोद ठेंगणे उपस्थित होते.
या सोहळ्यात विविध समाजघटकांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटात प्रवेश करून पक्षावरील विश्वास पुन्हा दृढ केला. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली, त्यात अरबाज पठाण यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीने जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संघटनेला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पखाले यांनी केले, तर प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी करून संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला. वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनीही यावेळी शासनाच्या जनविरोधी धोरणांवर तिखट भाष्य करत कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे आवाहन केले. सभागृह घोषणांनी गजबजून गेले होते.
या पक्षप्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज बेग, अदनान पठाण, प्रथमेश हेपट, अदनान शेख, सिद्दिक रंगरेज,सुमेर खान, इमरान पठाण, अब्दुल जफर, अकिल कुरेशी, प्रदीप खोब्रागडे, नरेंद्र लोणारे, महेंद्र चांदोरे, रामकृष्ण वैद्य, सोनू दुर्गे आदींनी परिश्रम घेतले.