वणी /
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी दरवर्षी आविष्कार " या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे विद्यापीठाद्वारे आयोजन केल्या जाते. ही स्पर्धा प्रथम जिल्हा स्तरावर आयोजित करून त्यातून विजेत्या स्पर्धक विद्यापीठ स्तरावर सहभागी होतात.
विद्यापीठ स्तरावर निवड झाल्यानंतर त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होते.
यावर्षी जवाहरलाल दर्डा इन्स्टिटूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेकनॉलॉजि, यवतमाळ येथे आयोजित आविष्कार २०२५ स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय अविष्कार २०२५ मध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये पोस्ट पदव्युत्तर लेवल तसेच ह्यूमानिटिज, लँगवेज अँड फाइन आर्ट्स या कॅटेगरी मधून हेमंत मालेकर या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अंडर ग्रॅज्युएट लेवल तसेच प्युअर सायन्स या कॅटेगरी मधून कु. पूजा बांदूरकर व देवेन पारखी या विदयार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हजबंडरी या कॅटेगरी मधून कु. लौतिका देठे व कु. मंजुला चिकनकर या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मेडिसिन अँड फार्मा या कॅटेगरी मधून देवेन पारखी व विनीत पोयाम या विदयार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. मेडिसिन अँड फार्मा या कॅटेगरी मधून कु. कुमकुम झाडे व कु. तूबा खान या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सुशील यादव या विद्यार्थ्यांने कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या कॅटेगरी मधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा आविष्कार चमू समन्वयक डॉ. अजय राजूरकर तथा मार्गदर्शक डॉ आदित्य शेंडे व डॉ. संघदीप उके यांच्या विशेष परिश्रमाने यश प्राप्त केलेल्या या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मत्ते यांच्यासह तांत्रिक सहकार्य करणारे श्री. मनोज सरमोकदम व श्री मनीष पेटकर यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजय मुकेवार, उपाध्यक्ष श्री नरेंद्र बरडिया तथा प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करीत जिल्हास्तरावर प्राप्त केलेले हे यश अधिक प्रयन्त करून विद्यापीठ स्तरावर देखील प्राप्त करावे अशा शुभकामना प्रदान केल्या.