बदल हवा तर चेहरा नवा..., हरहुन्नरी कलावंत सागर मुने आता निवडणूक लढवणार, राजकारणातून करणार समाजकारण..!

वणी /

नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकारणाचे तापमान चढू लागले आहे. शहरातील प्रत्येक चहाच्या टपरीवर गप्पांचा फड रंगला आहे की, यावेळी कोण येणार मैदानात..? अशावेळी शहरातील हरहुन्नरी कलावंत सागर मुने यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यांनी शहराचा विकास घडवून आणायचा असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही असे सांगितले.
सागर मुने यांचा परिचय आणि सामाजिक कार्य

शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड होती आणि लोक वर्गणीतून वृक्ष लावून समाज कार्याला सुरुवात केली. अनेकांना मदत व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे, वणी शहरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान आहे. 
स्वतः उत्कृष्ट नाट्य कलावंत व गायक आहे. संस्कार भारती समिती व सागर झेप संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले आहे. शाळा क्रमांक 5 येथे हनुमान मंदिराजवळ सागर मुने यांनी दरवर्षी भव्य तान्हा पोळा भरवून नागरिकांचे लक्ष वेधले. 2024 चा तान्हा पोळा वणी शहरात इतिहास घडवीणारा भरविण्यात आल्याने संपूर्ण वणी शहरात सागर मुने हे मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आले. राजकारण म्हणजे समाज कारण आहे व आणखी उत्कृष्ट करण्यासाठी निवडणूक लढवून जनतेचे कार्य करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली.

सागर मुने हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना कोणतेही पाठबळ नाही, किंवा त्यांना कोणी गॉडफादर नाही संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं कार्य सागर मुने यांनी केले आहे. त्यामुळे स्वबळावर स्वतःच अस्तित्व निर्माण केलेला हा माणूस आहे. प्रत्येक सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे व नागरिकांचे सहकार्य असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास प्रेरणा मिळाली असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post