वणी /
संत विदेही शंकरबाबा देवस्थान, चिखलगांव, (वणी) येथे शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर ते बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री संत विदेही शंकरबाबा यांच्या २९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री संत विदेही शंकरबाबा देवस्थान समिती रनि.न. जे/९७४ व समस्त ग्रामवासी चिखलगांव, वणी यांनी केले आहे.