पवनभाऊ एकरे यांच्या वाढदिवसानिमित्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

वणी/

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पवनभाऊ एकरे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा यवतमाळ जिल्हा व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.१३ ऑक्टोंबर ला सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अहिल्यादेवी होळकर सभागृह, लालगुडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजुंनी मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे मा श्री पवनभाऊ एकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐)

Post a Comment

Previous Post Next Post