देवाभाऊ आहेत ना मदतीला, अतिवृष्टीची चिंता कशाला?सरकारकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत, माजी आमदार बोदकुरवार यांची पत्रकार परिषदेतून माहिती

वणी /

मागील जुन ते सप्टेंबर २०२५ या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे त्यातील पिकांचे, शेतातील विहिरीचे, जनावरांचे, घरांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महायुती सरकारने आजपर्यंतची सर्वात मोठी म्हणजे ३१,६२८ कोटीची भरघोस मदत जाहीर केलेली आहे.
त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभे मधील वणी, झरी, मारेगांव या तालुक्याचा समावेश असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे व सरकारचे धन्यवाद मानीत असल्याचे माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

त्यांनी सांगितले की, कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८,५०० रुपये मदत, हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २७,००० रुपयांची मदत, बागायती शेतकऱ्यांना ३२,५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे वरील मदती करीता ६५ मिलीमीटर पावसाची अट आवश्यक ठेवण्यात आलेली नाही. तसेच सदर मदत मयार्दा ही २ हेक्टर वरून ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच सरकारने सर्व बँकांना आदेश दिले की, अतिवृष्टीच्या मदती मधून बँकांनी कर्ज वसुली, कर्जा मध्ये कपात करण्यात येणार नाही. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असल्याने त्यांचे धन्यवाद मानत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री देवाभाऊचे व महायुती सरकारचे धन्यवाद मानतो. असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंन्द बोर्डे, प्रा.महादेव खाडे, दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, शहर अध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाते, नितीन वासेकर, तालुकाध्यक्ष प्रदिप जेऊरकर, सत्यजित ठाकुरवार, निलेश होले, यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post