वणी /
राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक-०१ ऑक्टोंबर २०२५ रोज बुधवार ला दुःखद निधन झाले. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची विशेष ओळख होती. ते शहरातील प्रसिद्ध "देशी कट्टा" गृप चे सन्माननीय सदस्य होते. त्यामुळे देशी कट्टा गृप तर्फे दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ ला शनिवारी सकाळी ७:३० वाजता स्थळ देशी कट्टा ग्रुप आंबेडकर चौक अजय मेडिकल समोर येथे राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या स्मरणार्थ महाभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये वणी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच देशी कट्टयातील सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.