वणी /
विनोद हा चिरंतन आहे हास्य हे मानवाला मिळालेले वरदान आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे यांनी विनोदी साहित्याची जडणघडण केली मात्र वांग्मयीन प्रवाह म्हणून विनोदी साहित्य दुर्लक्षित झाले वांग्मयीन मूल्य म्हणून साहित्याची चिकित्सा होण्याची आवश्यकता आहे असे मत प्राध्यापक डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले .
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुलबर्गा कर्नाटक येथे आयोजित कार्यक्रमात विनोदी साहित्याचे वास्तव आणि भवितव्य या विषयावर डॉक्टर अलोने यांनी आपले मत मांडले. यावेळी परिसंवादाचे अध्यक्ष कोल्हापूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणजीत शिंदे. डॉक्टर अनिरुद्ध मोरे. कावेरी गजा कोश प्राध्यापक सर्वोत्तम सताळकर. विनोदी लेखक डॉक्टर रवींद्र तांबोळी. महामंडळाच्या कार्यवाहक सुनिता राजे पवार. महामंडळाचे सदस्य विदर्भ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रदीप दाते उपस्थित होते .
धकाधकीच्या वर्तमान स्थितीत मनावरचा ताण कमी करण्यासाठी विनोदी साहित्याची नितांत गरज आहे आजही विनोदी साहित्याची निर्मिती होत आहे परंतु ती दुर्लक्षित आहे समाज माध्यमावर विनोदाचा अतिरेक सुरू आहे विनोदी साहित्याची अभिरुची निर्माण करण्यासाठी विविध वाङ्मयाची ओळख करून देताना विद्यापीठ स्तरावर स्वतंत्रपणे विनोदी वाङ्मयाचा वांग्मयीन मूल्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे असे रोखठोक प्रतिपादन दिलीप अलोने यांनी केले. आपल्या विनोद प्रचूर खुमासदार शैलीने श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.