वणी /
वणी शहराची ग्रामदेवता जैताई माता मंदिर येथे नमो नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मोफत चष्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, वणी यांच्या वतीने करण्यात आले होते.
२० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या नमो नेत्र चिकित्सा शिबिरातील तपासणी झालेल्या व चष्म्याची आवश्यकता असलेल्या सर्व रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
सकाळपासूनच नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. प्रत्येक लाभार्थ्याला त्यांच्या दृष्टीक्षमतेनुसार योग्य नंबरचे चष्मे देण्यात आले.
या उपक्रमाद्वारे एकूण ३११ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी अनेक लाभार्थ्यांनी पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, संजय पिंपळशेंडे,
अॅड. कुणाल विजय चोरडिया,
ज्येष्ठ नेते, विजय पिदुरकर, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, तालुकाध्यक्ष सौ. मिराताई पोतराजे उपस्थित होते.
या वेळी मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले —
> “डोळ्यांची काळजी घेणे म्हणजे जीवनात नवा प्रकाश आणणे होय. ‘नेत्र संजीवनी अभियान’ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणारे एक यशस्वी माध्यम ठरत आहे.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिबिराचे संयोजक अॅड. कुणाल विजय चोरडिया व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.