गुरुकुंज आश्रम मोझरी येथे गुणवंत पचारे यांचा सत्कार

वणी /

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम केंद्रीय प्रचार विभाग मोझरी तर्फे गेल्या 56 वर्षांपासून उत्कृष्ठ सामाजिक तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराप्रमाणे सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान तथा प्रबलन देण्यासाठी संस्थेतर्फे हा सन्मान दिल्या जातो.
            या निमित्ताने वणी येथील संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत गेल्या 20 वर्षांपासून 
अनेक गावात स्वच्छता अभियान, बळीराजा चेतना अभियान तथा सामाजिक प्रबोधनपर कीर्तने करून समाजात एक आदर्श जीवन जगताना गोरगरिबांना मदतीचा आणि दातृत्वाचा हात असलेले आणि गेल्या 14 वर्षांपासून स्वतःच्या राहत्या घरी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करून सर्वधर्माची प्रार्थना घेतात. हेच निस्वार्थ कार्य लक्षात घेऊन पेशाने घोन्सा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असणारे गुणवंत पचारे यांनी केलेल्या सेवाकार्यांची दखल घेत यवतमाळ जिल्ह्यातून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ते इगतपुरी नाशिक येथे विपश्यना शिबिरात सहभागी असल्याने त्यांच्या पत्नी रुपाली पचारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. 
याप्रसंगी संस्थेतील सरचिटणीस जनार्दनपंत बोथे,सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रकाश महाराज वाघ, सुशील वणवे, पद्माकर ठाकरे, मारोतराव ठेंगणे
इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

🕯🕯🕯 *दीपोत्सव* 🕯🕯🕯

     *मंथरलेला काळोख सारा*
       *गगनी मनी ओसरू दे,*
     *निर्मळ तेज दीप सरिता,*
     *सागरास जीव व्यापू दे.*

चरा चरातला आनंद,
घरा घरातला मुकुंद,
मना मनातला गोविंद,
कणा कणातला छंद,
वना वनातला कुंद,
फुला फुलातला मकरंद,
प्रीतीचे अनुबंध,
प्रेमाचा गुलकंद,
पाखरे शोषण्या धुंद,
पशु पक्षी स्वच्छंद,
भेदण्या गगन अरुंद
पणती ज्योत मंद,
भावाबहिणींचे बंध,
भाळी सजण्या गंध,
अनवाणी बाप नंद,
दृष्टिनेही अंध,
चालण्या फुलांचे बांध,
गळो फाशीचे फंद,
*आसमंत सारा बहरू दे.*
भिजल्या बांडी घाम पिळता 
मोती रास पसरु दे,
ध्वज अजिंक्य भुमिपुत्राच्या
झोपडीवर फडकू दे.
*आरास जीवाची तेजा-*
 *सम उजळू दे,*
*अवसेच्या भयाण क्षणी*
*वनवास जीवाचा मावळू दे.*

*ज्ञानदीपाने घराघरातील* 
*क्रांतीज्योत जळु दे,*
*आज नव्याने प्रजेसह* 
*पिडा बळीची टळु दे.*

🎊🎊🎊 *दिवाळीच्या हार्दिक*🎊🎊🎊    
      🎊🎊🎊 *शुभेच्छा* 🎊🎊🎊
          🙏🙏🙏🙏🙏🙏
रचना:- *गुणवंत पचारे (वणी)*
            !!जय गुरु!!

Post a Comment

Previous Post Next Post