लिंकिंगद्वारे खते खरेदी करण्याची सक्ती, झरीत गुन्हे दाखल

वणी : दिपक छाजेड 

अनुदानित खते, युरिया, डीएपीसोबत इतर खते खरेदी करण्याची सक्त्ती करणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल - लिमिटेड या कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्रपाल सिंग (रा. यवतमाळ) याच्याविरुद्ध पाटण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले.

यासंदर्भात यवतमाळ जिल्हा कृषी साहित्य उत्पादक आणि विक्रेता असोसिएशनने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन दाखल केले होते. त्यानंतर झरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी घनश्याम वसंत बहिरम यांनी यासंदर्भात पाटण पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

"झरीजामणी तालुक्यात थोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत अनुदानित खते, युरिया, डीएपी सोबत इतर खते जबरदस्तीने कृषी साहित्य विक्रेत्यांना खरेदी करायला लावली जात होती.

कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्रपाल सिंग हे यासाठी कृषी विक्रेत्यांना सक्ती करीत होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
एखाद्या कृषी विक्रेत्याने अशा पद्धतीची खते विकत घेण्यास नकार दिला असता, विना लिंकिंग खते देण्यास भूपेंद्रपाल सिंग हे टाळाटाळ करीत होते.

याप्रकरणी शुक्रवारी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) घनश्याम बहिरम यांनी पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पाटण पोलिसांनी कोरोमंडल इंटरनॅशनल प्रतिनिधी भूपेंद्रपाल सिंग यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ (२) (डी) च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलिस करीत आहेत.

लिंकिंग शिवाय खते देण्यास टाळाटाळ, दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी!  

काही कंपन्या लिंकिंग शिवाय खते देण्यास टाळाटाळ करतात आणि शेतकरी बंधु विक्रेत्यांना दोषी ठरवतात, अनुदानित खते विक्री करताना अस्या अनेक अड़चनी येत असल्यामुळे संपूर्ण तालुका खत विक्रेते एकजुट होउन रासायनिक खत खरीदी बंद करण्याच्या तयारित आहे अशी माहिती मिळाली असून शासनाने याकडे लक्ष देऊन दोषी कंपन्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post