वणी /
कलेचा विकास व प्रसार करण्यासाठी व कलावंताच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी स्व. हरिभाऊ नागतुरे, ग्रामविकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था वनी व आर्टिस्ट स्पेस ग्रुप नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनी येथे राज्यस्तरीय चित्रशिल्प स्पर्धा व प्रदर्शन दिनांक 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
ही स्पर्धा व प्रदर्शन सर्व पद्धतीतून काम करणाऱ्या कलावंतासाठी व सर्वांसाठी खुले राहील ही स्पर्ध तीन विभागात असून व्यावसायिक कलाकार , विद्यार्थी विभाग व शिल्प विभाग यांच्यात स्पर्धा होणार आहे.