दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भांडेवाडा ग्रामपंचायतीला आमदार संजय देरकर यांची विकासाची भेट, ५९ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ

वणी /

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोमवारी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते भांडेवाडा ग्रामपंचायत परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधी व इतर शासकीय निधी मिळून एकूण ५९ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. 
यामध्ये — सिमेंट काँक्रीट रस्ता – ₹३० लाख, शाळेची संरक्षण भिंत – ₹१४ लाख, बंदिस्त भूमिगत गटार नाली १५ लाख असे ५९ लाखाच्या विकास कामाचा आमदार संजय देरकर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, सरपंच संगीता गोबाडे, उपसरपंच प्रेमानंद धानोरकर, बबनराव धानोरकर, अजय धोबे, मो. अस्लम, गुलाब धानोरकर, कविताई पोतराजे सरपंच नेत संदिप कारेकर . सतीश तेडेवार, मधूकर काळे, दिनेश बल्की , श्रावण पाटील , ग्रामसेवक किशोर आत्राम उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post