वणीमध्ये ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे आयोजनन, शामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी भाजपचा उपक्रम; विजेत्यांना रोख पारितोषिके

वणी : 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा लोकमान्य टिळक चौक, वणी येथे ही स्पर्धा होणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये १६ वर्षांखालील मुले व मुलींसाठी २.५ किलोमीटर, तर १६ वर्षांवरील पुरुष व महिलांसाठी ३.५ किलोमीटर अंतराची स्वतंत्र गटवारी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
‘नशामुक्त भारत’चा संदेश
युवकांमध्ये व्यसनमुक्ती, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून सहभागी होण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. नाव नोंदणी स्पर्धेच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी स्पर्धास्थळीच करता येणार आहे. स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहणार असून, पंचांचा निर्णय अंतिम राहील. तसेच वणी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘नशामुक्त भारत’चा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post