वणी /
"कीर्तनामध्ये मनोरंजन असल्यास हरकत नाही पण कीर्तन हे मनोरंजनाचे नव्हे तर मनोमंथनाचे साधन आहे. ज्याप्रमाणे शेतात, दुकानात किंवा कोठीत असणाऱ्या तांदळाचा भात होत नाही. त्यासाठी त्याला पातेल्यात यावे लागते त्याप्रमाणे जीवनाचे कल्याण होण्यासाठी कीर्तनात येणे अनिवार्य आहे. " असे विचार महाराष्ट्र शासन पुरस्कृत व्यसनमुक्ती सम्राट म्हणून विख्यात हरिभक्तिपरायण रामेश्वर महाराज खोडे यांनी व्यक्त केले.
वणी येथील जैताई देवस्थानाच्या प्रांगणात स्वर्गीय अरुण बिलोरीया आणि सौ. विमलताई धोटे यांचे माता पिता तुळसाबाई आणि दादाजी गोहणे यांच्या स्मृत्यर्थ आयोजित धनत्रयोदशीच्या प्रभातकालीन कीर्तनात ते व्यक्त होत होते. महाराष्ट्रात एकमेव असणाऱ्या या उपक्रमाचे हे २६ वे वर्ष होते हे विशेष उल्लेखनीय.
सागर मुने यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आपल्या कीर्तनामध्ये संसार हा न संपणारा आहे तर परमार्थ हाच खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाणार आहे. परमार्थात प्रयत्न करायला हवे तर संसार प्रारब्धाने होतो. गंगा पाप दूर करते पण कीर्तन पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट करते. गरम झाल्याशिवाय लोखंड सुद्धा नरम होत नाही. त्याच स्वरूपात तपाशिवाय आपल्यालाही नम्रता येत नाही. अशा विविध वाक्यांच्या आधारे निरूपण करीत खोडे महाराजांनी जीवनामध्ये व्यसनमुक्तीचे आणि मातृ-पितृ सेवेचे महत्व अधोरेखित केले.
जैताई देवस्थानचे सचिव ह.भ.प मनु महाराज तुगनायत यांच्या सूत्रसंचालनात माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तथा विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या हस्ते कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला.
कीर्तनास राजू चव्हाण यांनी संवादिनीवर, लक्ष्मण गायकवाड यांनी तबल्यावर तर विष्णू नरिंगे यांनी मंजिरीवर साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिहर भागवत, तुषार नगरवाला, देवानंद पोद्दार,