महांकाली मातेची अखंड ज्योत आली चारगाव येथिल महीला दुर्गा उत्सव मंडळात, भाविकभक्तांनी अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याचे आवाहन

वणी / विशाल ठोंबरे 

यावर्षी नवरात्र महोत्सवात तालुक्यातील चारगाव येथिल महीला दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने चंद्रपूर येथील प्रसिद्ध महांकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून आणण्यात आली आहे. विशेष म्हणजे ४५ किलोमीटर पायदळ अवानी चालुन महिलांनी आणलेल्या अखंड ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सदर ज्योत महीला दुर्गा उत्सव मंडळात दर्शनासाठी ठेवण्यात आली असून भाविकभक्तांनी अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी सचिन नावडे, शंकर वालकोंडे, सूर्यभान धूर्वे, बंडू खुसपुरे, देविदास चीकराम, संभा कोरवते, सुशांत नावडे, कैलास काळे , आकाश उईके, निलेश नावडे, करण कोरवते, आकाश चिकराम, चिनू बोधाडकर, सीमा वाभिटकर, मंगला नैताम, सारिका कोरवते, समीक्षा कोरवते, अश्विनी नावडे, पौर्णिमा मोहितकर, अंजली घुले, सुनिता नावडे, सुनिता करवते, कल्पना नावडे, प्रेमा कोरवाते , रत्नमाला वालकोंडे यांच्यासह महिला दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post