वणी /
दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना विरकुंड - बोर्डा मार्गावर 12 सप्टेंबर ला घडली. विशेष म्हणजे दुचाकीच अपघात झाल्यानंतर एका दुचाकीस्वाराने फोन करून दोन साथिदारांना बोलावून जखमीला मारहाण केली. यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. परिणामी नवेगाव येथिल जखमीला प्रथम उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने वणी येथीलच एका खासगी रुग्णालयात तर त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले. या घटनेची तक्रार वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली मात्र या घटनेला 10 दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने पोलिस प्रशासनाच्या विरोधात जखमीच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बंडु कवडु मोतेकर वय 40 वर्ष रा. विरकुंड नवेगाव असे फिर्यादीचे नाव आहे. दिनांक 19 सप्टेंबर ला दिलेल्या फिर्यादीनुसार 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 07/30 वा. फिर्यादी व त्याचा मित्र प्रकाश रामदास पुनवटकर वय 39 वर्ष रा. नवेगाव असे दोघेही त्यांची मो.सा. क्रमांक MH 29 AJ 9077 ने विरंकुंड वरुन बोर्डा येथे शेतीचे फवारणी चे औषध आणन्या करिता गेले होते. औषध घेवुन गावाकडे परत येत असाताना फिर्यादीचा मित्र प्रकाश पुनवटकर हा गाडी चालवीत होता. तर फिर्यादी पाठीमागे बसुन होता. रोडने येत असताना पडवे यांचे शेताजवळ समोरुन येणाऱ्या मोसा क्र. MH 29 BW 3789 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगाने व निष्काळीजीपणे चालवुन मोसा क्र. MH 29 AJ 9077 हिला समोरुन जोरात धडक दिल्याने फिर्यादी व त्याचा मित्र खाली रोडवर पडले त्यामुळे फिर्यादी चा मित्र प्रकाश पुनवटकर याचे डोक्याला, चेहऱ्याला, डाव्या पायाला गंभीर मार लागला त्याच वेळी मोसा क्र. MH 29 BW 3789 चा चालक याने फोन लावुन त्याचे दोन अनोळखी मित्रांना बोलावुन घेतले व त्यांच्या मित्राने जखमी असलेल्या प्रकाश पुनवटकर याला चापटाने मारले व MH 29 BW 3789 च्या चालकाला ईलाजा कामी घेवुन गेले त्याच वेळी मला सुद्धा मारतील म्हणुन फिर्यादी त्याचा मित्र प्रकाश पुनवटकर ला तेथेच सोडुन घरी गेला. दुसरे दिवशी सकाळी फिर्यादी बंडू कवडु मोतेकर हा जखमी असलेला त्याचा मित्र प्रकाश पुनवटकर रा. नवेगाव याचे घरी गेला त्यावेळी प्रकाश पुनवटकर हा घरी हजर होता तेव्हा त्याचे पत्नीला रात्री घडलेल्या घटने बद्दल सांगीतल्या नंतर त्याचे पत्नीने जखमी पती प्रकाश ला ईलाजा करीता सरकारी दवाखाना वणी येथे घेवुन गेली.
त्यानंतर दिनांक 19 सप्टेंबर रोजी फिर्यादी ला जखमीची पत्नी सौ.लक्ष्मी प्रकाश पुनवटकर यांचेकड़न समजले की प्रकाश हा नागुपर येथे भरती असून त्याचेवर उपचार सुरु असून झालल्या घटनेची तक्रार द्याची आहे असे म्हटल्याने जखमीचा मित्र फिर्यादी बंडू कवडु मोतेकर यांनी वणी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी बि.एन.एस. 2023 अंतर्गत 281, 125(a),125(b),115(2) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास जमादार बारसागळे करीत आहे.