उद्या माजी मंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार वणीत, दुर्गामाता मंदिराला देणार भेट

वणी /

 शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिध्द नवशक्ती दुर्गा माता मंदिराला महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार भेट देणार आहेत.

गुरुवारी दिनांक २५ सप्टेंबर ला वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस असल्याने ही भेट म्हत्वाची ठरणार आहे. 
गुरुवारी सकाळी ११:३० वाजता माजी मंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते दुर्गा माता मंदिरात महाआरती होणार आहे.
या महाआरती ला भाविकभक्तांनी दुर्गा माता मंदिरात उपस्थित रहावे असे आवाहन दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले आहे.

*मॉ भद्रकाली मातेची अखंड ज्योत दर्शनासाठी मंदिरात*


शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात दरवर्षी एक शक्तीपीठातून मातेची अखंड ज्योत आणली जाते पहील्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची ज्योत व दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील माता तुळजाभवानी ची ज्योत व या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी २२ सप्टेंबर ला हरियाणा कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलीत करुन आणण्यात आली आहे. या ज्योतीचे विधीपूर्ण स्थापना करुन त्यांचे पावित्र्य जपन करुन नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रध्देने व उत्साहाने प्रारंभ झाला असून ही ज्योत दुर्गा माता मंदिरात भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. रोज हजारो भाविक भक्त अखंड ज्योतीचे दर्शन घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post