"तिच्या" आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी पती ५० दिवसांपासून मोकाटच पत्रकार परिषदेत कुटुंबियांचा वणी पोलिसांवर गंभीर आरोपप्रकरण "सेटींग" करण्यासाठी वरोऱ्यावरुन आलेला तो पोलिस अधिकारी कोण?

वणी /

 पतीच्या "अनैसर्गिक" छळाला कंटाळून एका नव विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १९ जुलै २०२५ रोजी शहरालगत असलेल्या वणी- मुकुटबन मार्गावरील साईलीला नगरी येथे घडली होती. सदर प्रकरणात मृतक विवाहित तरुणीचे वडील किशोर करमरकर यांच्या तक्रारीवरून मयत युवतीचे पती, सासू व नणंद विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आत्महत्येच्या घटनेल ५० दिवस उलटूनही पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीला वणी पोलिसांनी अटक केली नाही.

तक्रारदार वडील व कुटुंबीयांनी तीनदा उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. परंतु मुख्य आरोपी पती अद्यापही मोकाटच फिरत आहे.

त्यामुळे मयत आरती जयबुद्ध बुरचुंडे हिचे वडील किशोर भाऊराव करमरकर, आई रेखा करमरकर, भाऊ शुभम करमरकर, बहीण पूजा पुडके आणि जावई राहुल पुडके यांनी रविवारी ७ सप्टेंबर रोजी वणी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन वणी पोलिसांवर निष्क्रियेताचा आरोप लावला. तसेच पीडित कुटुंब आज सोमवारी ८ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे फिर्यादी किशोर करमरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिचे पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे, सासू प्रतिमा बुरचुंडे व नणंद, सर्व रा. मातोश्रीनगर, जीवक वाचनालय जवळ, वरोरा, जिल्हा चंद्रपूर विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सासू व नणंद यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिली.

मात्र मुख्य आरोपी पती जयबूद्ध संकल्प बूरचुंडे यांनी दाखल केली अग्रिम जामीन याचिका हायकोर्टाने फेटाळली. मात्र त्यानंतरही वणी पोलिस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत आहे.
पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने मृतका व कुटुंबियांना न्याय मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

"सेटिंग" साठी आलेला तो पोलीस अधिकारी कोण ?

माहितीनुसार आरती बुरचुंडे हिने आत्महत्या केल्यानंतर जेव्हा फिर्यादी वडील तक्रार देण्यासाठी वणी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले, तेव्हा वरोरा येथील पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी व एक वकिलांनी त्यांची भेट घेऊन पोलीस तक्रार न करता परस्पर देवाण घेवाण करून प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. असा खुलासा फिर्यादी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे महिला अत्याचार व हुंडाबळीच्या प्रकरणात दलाली करणारा तो पोलीस अधिकारी कोण ? याचाही खुलासा पोलिसांनी करावा. अशी मागणी करण्यात आली तसेच मृतक मुलीला न्याय न मिळाल्यास पोलिस स्टेशनसमोरच आमरण उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post