पोलीस कर्मचारी उमेश डोंगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सायंकाळी वणी तील मोक्ष धाम येथे होणार अंतिम संस्कार

वणी /

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी उमेश विठ्ठलराव डोंगरे (45) रा. काळे लेआउट वणी यांचे दिनांक 7 सप्टेंबर ला सायंकाळी सात वाजता चे सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दिनांक 6 सप्टेंबरला नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. सात तारखेला सकाळी अकरा वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले त्यातच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यात त्यांचे निधन झाले.
 त्यांच्या मृत्यूने पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मागे आई- वडील पत्नी, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिव दिनांक 8 सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत वणीत येणार असून सायंकाळी वणी येथील मोक्षधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post