वणी /
येथील काळाराम मंदिराजवळ राहणारा नायक सुरज सुधाकर वागदरकर हा सध्या लष्करी सेवेत भूतान मध्ये कार्यरत आहे. नुकतेच भूतान मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. ते येथे सुट्टीवर आल्यानंतर त्याचा येथील सहजयोग ध्यान केंद्रातर्फे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे.
सुरज हा दिनांक 11 जून 2018 ला लष्करी सेवेत दाखल झाला होता. प्रशिक्षण संपल्यानंतर विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर नायक या पदावर बढती झाल्यानंतर त्याला भूतान सीमेवर पाठविण्यात आले. येथे भारत व भूतान देशात झालेल्या करारानुसार त्या देशातील युवकांना सैन्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. या दरम्यान भूतान मध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 15 देशातील 3 हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून सुरज ने तिसरा क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली आहे.
सुरज हा प. पु. निर्मला माता प्रणित सहजयोगाच्या माध्यमातून नियमित ध्यान केल्याने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याची बौद्धिक पातळी वाढली. त्याची एकाग्रता वाढली. यामुळे पहिले भारतीय लष्करात सामील होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्याने नेत्रदिपक यश मिळविले. या निमित्त गणेशपूर येथील सहजयोग ध्यान केंद्रात आयोजित कार्यक्रमात सूरजचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशाचे श्रेय तो सहजयोगाला व त्यांचे प्रशिक्षक त्योगेंद्र शेंडे व आई वडिलांना देतो.