वणी /
मराठी आती नहीं क्या, यहा काम करने को क्यु आया, म्हणत रस्त्याचे बांधकामावर उपस्थित असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजर सह कामगारांना मारहाण करण्यात आल्याची फिर्याद दाखल होताच मनसे नेते राजु उंबरकर सह साथिदारांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सदरची घटना दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घोंसा गावाजवळ असलेल्या जिनिंगजवळ रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घडली त्यानंतर तिसऱ्या दिवशी 20 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास वणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
अजय सूदामजी हिंगाणे, वय 49 वर्षे, व्यवसाय नोकरी (प्रोजेक्ट मॅनेजर) रा. महादेव मंदिर वार्ड, बाबूपेठ, चंद्रपूर, असे फिर्यादीचे नाव आहे.
फिर्यादी अजय हिंणाणे यांच्या तक्रारी नुसार फिर्यादि व त्याचे सोबत काम करनारे साथीदार हे घोन्सा गावाजवळ असलेल्या जिनींगजवळ कंपणीचे रोडचे बांधकामाचे काम पाहात असतांना निरपेंन्द्र पटेल याचे जवळ वणी कडुन दोन चार चाकी गाड्या आल्या व त्यातुन आरोपी क्र.1 व त्यांचे सोबत त्यांचे साथीदार उतरले व तेथेच जवळ काम करत असलेल्या निरपेंनद्र पटेल याला त्याचे नाव विचारुन रसत्याचे बांधकामाचे विचारना केली असता निरपेंन्द्र पटेल याने हिंदी मध्ये सांगितले असता राजु उंबरकर यांनी थापडा मारल्या व मराठी आती नहीं क्या यहा काम करने को क्यु आया, असे म्हटले व तुम्ही लोक रस्त्याचे काम बरोबर करत नाही असे म्हनाले तेव्हा फिर्यादीने राजु उंबरकर यांना म्हटले की आम्ही रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीनेच करत आहो असे म्हटले असता त्यांनी फिर्यादी च्या गालावर थापडा मारल्या, व फीर्यादीने त्याचे नाव, गाव, जात सांगितले व मी मराठीच आहे असे फीर्यादीने सांगितले असता फिर्यादीला तु गप्प बस जास्तं बोलु नको. असे म्हणाले फिर्यादी सोबत काम करत असलेल्या सागर तन्नीरवारं याला सुद्धा हे काम तु पाहातो काय असे विचारले असता होय म्हटल्यावर आरोपींनी सागर तन्नीरवार यांना सुद्धा गालावर थापडाने माराहण केली त्यानंतर सागर तन्नीरवार व निरपेंन्द्र पटेल यांना फिर्यादीचे चार चाकी गाडीमध्ये जबरजस्तीने बसायला लावुन त्याचे सोबत असनारे दोन मानसे फिर्यादी चे गाडीमध्ये बसविले व रस्त्याचे बांधकाम दाखव म्हणुन रासा येथील कंपणीचे प्लॉट मध्ये घेऊन गेले. त्या सर्वांना मोठमोठयाने शिवीगाळ केली. व तुमच्या ठेकेदाराला बोलवा असे म्हटले. तेव्हा फिर्यादींनी राजु उंबरकर यांना सागितले की आमच्या ठेकेदाराची पत्नीची तब्बेत ठीक नसल्याने ते येऊ शकत नाही तुम्ही ठेकेदाराशी फोनवर बोला असे म्हटले असता मी बोलत नाही उद्याच मालकाला माझ्याकडे पाठवुन दे नाहीतर प्लॉन्ट जाळुन टाकीन असे म्हणत प्लॉन्ट मधील काम करनारे मजुर बाहेर राज्यातील असलेल्या दिलखुस कुमार व मनखुश कुमार यांना सुद्धा विनाकारण थापडाने मारहान केली. अशा फिर्यादिचे जबानी रिपोर्ट वरुन मनसे नेते राजु उंबरकर सह साथिदाराविरुध्द वणी पोलीसात कलम 115 (2), 127 (2), 352,351(3), 329(3), 191 (2), 189(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.