नवरात्रामध्ये वणीत येणार हरियाणातील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत, भाविकभक्तांनी अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे - रवि बेलुरकर

वणी - 

या वर्षी नवरात्र महोत्सवात प्रसिध्द नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने ५१ जागृत शक्तीपीठापैकी हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलीत करुन वणी नगरीत आणण्याचा निर्धार नवशक्ती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केला आहे.

वणी नगरीत घटस्थापनेच्या दिवशी दि. २२ सप्टेंबर २०२५ रोज सोमवारला ही ज्योत आणली जात आहे. दरवर्षी एक शक्तीपीठातून मातेची अखंड ज्योत आणली जाते पहील्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची ज्योत व दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील माता तुळजाभवानी ची ज्योत व या वर्षी हरियाणा कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलीत करुन आणली जाणार आहे. या ज्योतीचे विविध विधीपूर्ण स्थापना करुन त्यांचे पावित्र्य जपन करुन नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रध्देने व उत्साहाने प्रारंभ होतो व ही ज्योत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. 
९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. ही अखंड ज्योत आणण्यासाठी दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांचे सोबत चंदन मोहुर्ले, नितीन बिहारी, अविनाश कामटकर, मारोती गोखरे जाणार आहे. तरी वणी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड ज्योतीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, स्वप्नील बिहारी, राजकुमार अमरवानी, विलास डवरे, सतिश कामटकर, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजु जयस्वाल, समिर लाभसेटवार, मनु महाराज तुगनायत, अशोकजी बतरा यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post