"वणीच्या श्री.रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाला जिल्ह्यातील आदर्श गणेशोत्सव पुरस्कार "

वणी / विशाल ठोंबरे 

सण- उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकी जपावी, पर्यावरणपूरक सण साजरे व्हावेत, तसेच संस्कृतीचे जतन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार दिले जातात, 
यावर्षीचा जिल्हास्तरीय पुरस्कार 
 यवतमाळ जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील 
श्री रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वणी ला आदर्श गणेशोत्सव पुरस्कार जाहीर केला. 
यवतमाळ येथे प्रेरणा सभागृहात आयोजित कार्यक्रमात मा. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे हस्ते श्री रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वणी ला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 या पुरस्काराचे मानकरी श्री रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा वणी पोलिस प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
 यावेळी जिल्हा पोलिस प्रशासन, वणी पोलिस स्टेशन, मंडळाचे कार्यकर्ते, गणेशोत्सवात सहभागी नागरिक या सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष मनोहर वरारकर सर व सचिव विलास पारखी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post