नगर पालिकेच्या भरमसाठ कर वाढी विरोधात आज कॉंग्रेसचे आंदोलन, नागरिकांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे - संजय खाडे

वणी /

वणी नगरपालिकेने नवीन मालमत्ता कर आकारणी केली आहे. मात्र ही आकारणी गेल्या कराच्या दुप्पट व चौपट आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणाताही ठराव घेण्यात आला नाही. पुढील चार वर्षांसाठी ही आकारणी आहे. नवीन कर आकारणीमुळे वणीकरांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. नवी कर आकारणी कर वाढ रद्द करा या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात आज २२ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. 
या आंदोलनात सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध सेलचे सदस्य आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
 संजय खाडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post