विजय चोरडिया यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव, मुख्यमंत्री, माजी वनमंत्री यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!

वणी /

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकारण, अशा क्षेत्रातील लोकप्रिय नेतृत्व असलेले भाजपा चे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांच्या वाढदिवसनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणविस, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सहीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हितचिंतकांनी विजय चोरडिया यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.
            संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणिव असलेले दानशूर व्यक्तीमत्व विजय चोरडिया दि. 4 सप्टेंबर ला वाढदिवस होता. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत चोरडिया यांच्याबद्दल कायम आदर पहायला मिळते. त्यांनी लोकप्रियता आपल्या विधायक कार्यातून प्राप्त केली आहे, एका धनाढ्य कुंटुबातून आलेले असतांनासुद्धा त्यांच्या वर्तनात कधीही बडेजाव दिसला नाही त्यामुळे त्यांचे हजारोच्या संख्येने हितचिंतक आहेत. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त श्री विनायक मंगल कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लाँयन्स क्लब चे माजी अध्यक्ष राजाभाउ पाथ्रडकर, भाजपाचे जिला उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, शहर भाजपा अध्यक्ष अँडु निलेश चौधरी, रील स्टार विलास झट्टे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष शिवराज पेचे, विद्युत कंत्राटदार राजाभाउ बिलोरीया, विश्व हिंदू परिषद व रोटरी क्लब चे पदाधिकारी तसेच राज्यभरातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय, कला, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधितज्ज्ञ, पोलीस, शासकीय अधिकारी, पत्रकारिता, विविध संस्था, संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.
                  सर्व क्षेत्रात विजय चोरडिया यांचे भरीव योगदान आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सुत्र त्यांनी स्वीकारले आहे.
 सतत सर्व समाजाच्या विकासाचा ध्यास घेऊन समाजाला कोणती गरज आहे हे लक्षात घेऊन ऊन पावसाची तमा न बाळगता ते कार्य करत असतात. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट विजय चोरडिया यांच्यावर विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला.

Post a Comment

Previous Post Next Post