वणी /
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश ( Shri Ganesha ). गणपती बाप्पा, या गणपती बाप्पाच्या उत्सवात ( गणपती उत्सव ) महाराष्ट्रातील प्रत्येकजण दंग होऊन जातो. घराघरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना होते. शहरांमध्ये, गावांमध्ये ठिकठिकाणी दहा दिवस गणपती बाप्पा मोरयाचा गजर होत असतो. गणेश मंडळे, त्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गणपती बाप्पा समोरचे देखावे एकच धमाल असते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करायला सुरुवात केली आणि बघता बघता या उत्सवाचे स्वरुप व्यापक झाले. या उत्सवाला सामाजिकतेचे , समाजोपयोगी उपक्रमाचे स्वरुप देत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गावांमध्ये “एक गाव एक गणपती” ( One village one Ganesha ) ही संकल्पना रुढ झाली आहे.
वणी तालुक्यातील मानकी गावात सर्वांचा मिळून एकच गणपती बसविला जातो. श्री बाल गणेश मंडळांच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.
यावर्षी वणी तील दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे विजय बाबू चोरडिया, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, भाजपचे युवा नेतृत्व नितीन वासेकर , आशिष पावडे, संदीप बेसरकर यांनी बाल गणेश मंडळाला भेट दिली.
यावेळी प्रथम ग्राम पंचायतीच्या वतीने सरपंच कैलास पिपराडे, सदस्य नानाजी पारखी, परशुराम पोटे यांनी ग्राम पंचायत कार्यालयात श्री विजय बाबू चोरडिया यांचा सन्मान केला. त्यानंतर बाल गणेश मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने विजय बाबू चोरडिया, संजय पिंपळशेंडे व राजु धावंजेवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती विजय बाबू चोरडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बाल गणेश मंडळाला कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी देणगी स्वरुपात त्यांनी ५००१/- पाच हजार एक रुपयाची पावती फाडली तसेच पुढच्या वर्षी श्री बाल गणेश मंडळाला १६ वर्षे पुर्ण होत असल्याने "जगन्नाथ बाबा" यांची प्रतिमा असलेली गणपतीची मुर्ती भेट देणार असल्याचे त्यांनी मंडळांच्या सदस्यांना सांगितले.
यावेळी मानकी गावाचे सरपंच कैलास पिपराडे, ग्राम पंचायत सदस्य, नानाजी पारखी, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे, अनिल ठेंगणे, अमरदीप वासेकर, सौ.अरुणा वासेकर, श्री बाल गणेश मंडळांचे अध्यक्ष -सचिन कुत्तरमारे, उपाध्यक्ष- विठ्ठल पारखी, सचिव -गणेश वाढई, कोषाध्यक्ष -विठ्ठल गौरकार, सदस्य, अनिकेत पोटे, अविनाश सरवर, प्रथम वासेकर, अमोल मिलमिले, सुमिथ थेरे, आकाश सरवर, निखिल गोहणे, सुरज सोनटक्के, सौरभ वासेकर, रवी माहुरे, चेतन मालेकर इत्यादी सदस्यांसह गावकरी उपस्थित होते.सौ. अरुणा ईश्वर वासेकर यांच्या घरी विजय बाबू चोरडिया, संजय पिंपळशेंडे यांनी सदिच्छा भेट दिली तो क्षण...