नवरात्री निमित वणी विधानसभा क्षेत्रातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन

वणी /

२२ सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या पवित्र दिवसांत मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव व उत्साहाने कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या पवित्र काळात नागरिकांच्या धार्मिक भावनांचा सन्मान राखणे व सामाजिक सौहार्द जपणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी, मारेगाव येथिल मटण, चिकन व मच्छी मार्केट १० दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावी अशी मागणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांच्या नेतृत्वात येथिल उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.

नवरात्री हा धार्मिक सण असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर उपवास, व्रत व पूजा-अर्चा करतात. या काळात अशा व्यवहारामुळे श्रद्धाळूच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचतो. ज्यामुळे अनेक भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. याबाबत मांसविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पत्रक देऊन आपली प्रतिष्ठाने 10 दिवस बंद करण्याचा आदेश काढावा ज्यामुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही.

सोबतच उघड्‌यावर मांसविक्री करणाऱ्यांची दुकाने त्वरीत बंद करावी. नवरात्रीच्या १० दिवसांमध्ये सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आदेश काढून वणी विधानसभा क्षेत्रातील (वणी-झरी-मारेगाव) येथिल सर्व मटण, चिकन व मच्छी मार्केट नवरात्रीच्या १० दिवसांच्या कालावधीत बंद ठेवण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी अजय चन्ने, कुंदन पेंदोर,राहुल कोलते, साकेत भुजबलराव,तुषार काकडे, निखिल मडावी, सोनू नरड, मनोज वाकटी, गौरव पांडे इत्यादी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post