श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची आमसभा उत्साहात संपन्न.

वणी /

संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता वसंत जिनिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. 

 प्रास्ताविकात पतसंस्थेचे संचालक श्री सुरेश बरडे यांनी संस्थेची प्रगती व सामाजिक सहभाग याबद्दल सांगितले. 
मनोगत उपाध्यक्ष मा. विवेकानंद मांडवकर यांनी व्यक्त केले. आम सभेचे विषय वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांनी केले. आर्थिक वर्ष 2024-25 चा आर्थिक अहवाल सभेत सादर करण्यात आला. उत्स्फूर्त सहभागाने सभा संपन्न झाली. 
संस्थेची स्थापना 1989 मध्ये 
स्व. भय्याजी पामपट्टीवार यांनी केली. 2002 पासून संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांचे नेतृत्वाखाली संचालक मंडळा चे विकासात्मक धोरण व सभासदांचा विश्वास यामुळे संस्था प्रगती करत आहे. स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ' अ ' मिळालेल्या या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. 21 शाखा आहेत. सभासद 91355 आहेत. नफा 2.97 कोटी झाला असून लाभांश 3 टक्के आमसभेत मंजूर करण्यात आला. आज संस्थेत ठेवी 873.32 कोटी आहे. संचालक श्री चिंतामण आगलावे यांनी सर्वांचे आभार मानले. संचालन पायल परांडे यांनी केले. या सभेत संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post