शेतातील विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, पठारपुर येथिल घटना

वणी /

शेतातील विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पठारपुर येथे घडली.
 प्रमोद कवडु गारघाटे (52) रा. पठारपुर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

 दररोज प्रमाणे बुधवारी दि. 14 सप्टेंबर रोजी प्रमोद आपल्या शेतात गेले होते दरम्यान इलेक्ट्रिक मोटार पंप सुरू करण्यासाठी मीटर बॉक्स उघडताच त्यांना विद्युत प्रवाहाचा झटका लागला हि घटना सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मृतक शेतकऱ्याच्या पाठीमागे 
 पत्नी सुनिता प्रमोद गारघाटे ( 45), मुलगा निखिल(25), मुलगी प्रिया उपरे
(विवाहित, 30 वर्ष), वडील व आई असा आप्त परिवार आहे.
घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post