आदिवासी टायगर सेनेच्या जिल्हा महासचिवपदी अमोल कुमरे

वणी /

आदिवासी समाजाच्या हक्क आणि सन्मानासाठी काम करणाऱ्या आदिवासी टायगर सेना या संघटनेच्या यवतमाळ जिल्हा महासचिवपदी अमोल कुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अमोल कुमरे हे समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रश्न आणि हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विदर्भ अध्यक्ष अॅड. संतोष कुळमेथे यांनी विदर्भ संघटिका रंजना आत्राम, जिल्हा अध्यक्ष बंडूजी तोडसाम आणि महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली केराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना नियुक्तीपत्र दिले. 
या निवडीनंतर बोलताना अमोल कुमरे यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांना एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून लढा देणार आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्याला समाजाचे ऋण फेडण्याची संधी दिली, असेही ते म्हणाले.

सदर नियुक्ती बद्दल अमोल कुमरे मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!)💐💐

Post a Comment

Previous Post Next Post