वणी, करंजी येथील टोल नाक्यांवर स्थानिकांना टोल माफीची मागणी, मनसे वाहतूक सेनेचे निवेदन

वणी / 

            आयव्हीआरसीएल कंपनीच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वणी आणि करंजी येथील टोल नाक्यांवर स्थानिकांना टोलमधून सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. 
सदर निवेदनाची एक प्रत कंपनीच्या व्यवस्थापकांना सुद्धा देण्यात आली.

▪️काय आहे मागणी?

निवेदनानुसार, टोल नाक्याच्या २० किलोमीटरच्या परिसरातील सर्व प्रकारच्या लहान वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या परिसरातील अनेक लोकं दररोज कामासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी याच रस्त्याचा वापर करतात. त्यांना वारंवार टोल भरावा लागत असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत आहे.

◾ शासनाच्या धोरणाचा आधार

      निवेदनात, शासनाच्या धोरणानुसार स्थानिक नागरिकांना टोलमध्ये सवलत देण्याची तरतूद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मागणीचा गंभीरतेने विचार करून २० किलोमीटरच्या आतील सर्व लहान वाहनांना टोल माफ करण्याची विनंती करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर काय निर्णय घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यावर कुठलीही कारवाई न झाल्यास स्थानिक वाहनधारकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती खान यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post