ऍड. कुणाल चोरडिया यांच्यावर भाजपाने आणखी एक सोपविली जबाबदारी! भाजप युवा मोर्चा व उत्तर भारतीय आघाडीच्या यवतमाळ जिल्हा प्रभारीपदी ऍड. कुणाल चोरडिया यांची नियुक्ती , भारतीय जनता पक्षात उत्साहाचे वातावरण

वणी /

वणी शहरातील युवा तडफदार नेतृत्व ऍड. कुणाल विजय चोरडिया यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजप युवा मोर्चा व उत्तर भारतीय आघाडीच्या यवतमाळ जिल्हा प्रभारीपदी ऍड. कुणाल विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. हि माहिती खुद्द ऍड. कुणाल चोरडिया यांनी दिली.  
काही दिवसांपूर्वी  भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद आणि आता त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजप युवा मोर्चा तसेच उत्तर भारतीय आघाडीचे यवतमाळ जिल्हा प्रभारी पद मिळाल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल चव्हाण यांचे विशेष आभार मानले व सोपवलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या निवडीबद्दल वणी शहरासह वणी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!💐💐

Post a Comment

Previous Post Next Post